आवडी निवडीचं जग!!

हे पहा, नियम म्हणजे नियम! उगाच नको मला गळ घालूस!... कुठलीही गोष्ट असो, फार बडबडतो हा ... अगदी गाडी सुटायची वेळ झाली की ही स्टेशनवर येते… आपल्या स्वतःच्याच जगात रमलेला असतो हा! … एका मेसेज मध्ये काम होत असताना फोन कशाला करते … आठवताहेत का ही सगळी वाक्य?... हो, आपलीच आहेत! आपल्यापैकी प्रत्येकाने कधी न कधी ही नक्कीच उच्चारली असणार. दुसऱ्या कुणाच्या संवादामध्ये अशी वाक्य असतील तर आपण हसतो, पण आपण स्वतः सहभागी असलेल्या संवादामध्ये या सगळ्याची गंमत घेणं मात्र कठीण होऊन जातं! याहीवेळी जर गंमत घेता आली तर? हे शक्य आहे? अगदी सहज शक्य आहे हे! आवडी-निवडीचं जग (World Of Preferences) या कोर्समध्ये आपण हेच शिकणार आहोत. यातील गंमत समजावून घेणार आहोत.

Course Access : 31 Days
107 Enrolled
Course Access : 31 Days
Certification : Yes
Instructors : 1
Duration : 12 Hours
Documents : 5
Videos : 1
Test : 3
Languages : Mar / Eng
4750

What you'll Get

 • स्वभावामधील फरकाचा पद्धतशीरपणे उपयोग करणे
 • संवादातील विसंवाद कमी करत सुसंवादाकडे घेऊन जाणे
 • 8 live interactions
 • Videos, Reference Notes, Quizzes

Description

आठवताहेत का ही सगळी वाक्य?... हो, आपलीच आहेत! आपल्यापैकी प्रत्येकाने कधी न कधी ही नक्कीच उच्चारली असणार. दुसऱ्या कुणाच्या संवादामध्ये अशी वाक्य असतील तर आपण हसतो, पण आपण स्वतः सहभागी असलेल्या संवादामध्ये या सगळ्याची गंमत घेणं मात्र कठीण होऊन जातं! याहीवेळी जर गंमत घेता आली तर? हे शक्य आहे? अगदी सहज शक्य आहे हे! आवडी-निवडीचं जग (World Of Preferences) या कोर्समध्ये आपण हेच शिकणार आहोत. यातील गंमत समजावून घेणार आहोत.

या कोर्समध्ये आपण नक्की काय करणार?

आपण या कोर्समध्ये, प्रवासात हे शिकणार आहोत.

 1. अनावश्यक वाद टाळून आवश्यक वादाचं सहकार्यात रूपांतर करणे
 2. स्वतःची बलस्थानं ओळखून त्यांच्या योग्य वापराने मर्यादांवर मात करणे.
 3. कुठलंही काम करताना कुणाची मदत घेतली तर पूरकता वाढेल याचा विचार करणे.
 4. आपल्या बरोबरच्या लोकांच्या एकमेकांच्या पूरक वैशिष्ट्यांचा सहकार्य वाढवण्यासाठी वापर करणे.
 5. स्वतःवरील (प्रसंगी इतरांवरील) मानसिक ताणाचे निरसन करणे.
 6. स्वतः आणि आपल्या बरोबरच्या लोकांची नैसर्गिक स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन विसंवाद कमी करणे.
 7. स्वभावाच्या विविधतेला सहज सामावून घेणे.
 8. स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाचा योग्य वापर करून निर्णय घेणे.

किती सेशन्स असतील?

प्रत्येकी ६० ते ७० मिनिटांची एकूण ८ सेशन्स असतील. प्रत्येक आठवड्यात दोन असे एकूण चार आठवडे.

सेशन १: मी असा आहे... म्हणजे काय?

सेशन २: 'असा' म्हणजे नक्की कसा? का?

सेशन ३: मी, आपण, थालीपीठाची भाजणीच!

सेशन ४: अरेच्च्या, संवादाचं सुद्धा मॉडेल? OR त्वम चत्वारि वाक्पदानि

सेशन ५: वादी, संवादी विसंवादी

सेशन ६: आधी स्ट्रॅटेजी ... मग जीभ! [OR संवादाची सुद्धा स्ट्रॅटेजी? यापेक्षा मौन बरं! ]

सेशन ७: चालत्याबोलत्या माणसांचं रडार!

सेशन ८: कठीण - माणूस की परिस्थिती?

हा कोर्स / प्रवास कुणी करावा?

प्रत्येकाने! वय वर्ष १८ पासून पुढे, प्रत्येकासाठी! व्यावसायिक, Manager (व्यवस्थापक), गृहिणी, विद्यार्थी, पालक, मित्र, टीममेंबर, Leader (नेता), आपल्यापैकी प्रत्येकासाठी! कुठलंही काम करणाऱ्या व्यक्तीसाठी!

Course Ratings
0
0 Rating
5 Star
0
4 Star
0
3 Star
0
2 Star
0
1 Star
0