Course Access | : | 31 Days |
Certification | : | Yes |
Instructors | : | 1 |
Duration | : | 10 Hours |
Documents | : | 8 |
Test | : | 8 |
Languages | : | Marathi |
आपली संस्कृत भाषा जिला आपण आपली प्राचीन भाषा म्हणून ओळखतो. जिला ज्ञानभाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषा जी अनेक भारतीय भाषांची आई आहे कारण त्यातील अनेक शब्द संस्कृत मधूनच आले आहेत. वेद- इतिहास- पुराणांची भाषा. रामायण-महाभारताची भाषा, खगोल-गणित-स्थापत्य-व्याकरण-वैद्यक अशा शास्त्र ग्रंथांची भाषा. थोडक्यात विपुल आणि समृद्ध अशा वाङमयाने नटलेली अशी ही भाषा.
“संस्कृति: संस्कृताश्रिता l” असं म्हंटलच आहे.
आज संस्कृत भाषेचा अभ्यास जगभर अनेक लोकं करत आहेत मग आपणच आपल्या ह्या ठेव्यापासून दूर का बरं राहायचं ? खरं तर अगदी लहान मुलं ते मोठी माणसं सर्वाना आवडेल ,सर्वाना त्यातून काही ना काही आनंद देणारी अशी ही भाषा आहे . मनोरंजन करता करता काहीतरी बोध करून देणारी अशी ही भाषा. आणि म्हणूनच लहानपणापासून जर याची गोडी लागली तर यासारखा दुसरा आनंद नसेल ! तसाच हा कोर्सदेखील आहे.
संस्कृत भाषा ही मुळात मौखिक परंपरेमुळे इतकी हजार वर्षे टिकून राहिली आहे, पिढ्यानपिढ्या वेद मंत्र हे अशा प्रकारे पुढे जात राहिले , म्हणून तर त्याला श्रुती म्हणतात . असे पाठांतर असलेल्यांचा मेंदू अतिशय कार्यक्षम असतो, हे science ने ही सिद्ध केले आहे. मुळात संस्कृत भाषा शिकल्याने उच्चार तर स्पष्ट होतातच तसेच इतर भाषा शिकणे सुद्धा अधिक सोपे होते. अतिशय छोट्या मांडणी मधून मोठ्या विषयापर्यन्त घेऊन जायचं हेच मला वाटतं संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे . तसाच हा कोर्सदेखील आहे.